राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले : २ महिलांचा मृत्यू

विक्रम होईल इतके ‘मिग २१’विमानांचे अपघात झाले असतांना ही विमाने बाद का करण्यात येत नाहीत ? अशी सदोष विमाने असणे, हे सक्षम युद्धसज्जेतेचे लक्षण कसे असू शकते ?

हक्काच्या घरासाठी छोटा रूद्र आणि त्याच्या नातेवाइकांचे उपोषण

तिवरे येथे अतीवृष्टीमुळे धरण फुटले होते. या दुर्घटने रूद्र चव्हाण याचे वडील रणजित, आई ऋतुजा, तसेच बहीण दुर्वा यांचा मृत्यू झाला होता. या वेळी रूद्र त्याच्या आत्याकडे वास्तव्यास असल्यामुळे वाचला होता.

केरळमध्ये नौका उलटल्याने २२ पर्यटकांचा मृत्यू

मृतांमध्ये मुले आणि महिला यांची संख्या अधिक आहे. ४ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रत्नागिरीला येत असतांना दहिसरचे मनसे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू

मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्‍या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

ढवळी येथील भंगारअड्ड्याला भीषण आग : लाखो रुपयांचे भंगार भस्मसात

डिचोलीतील उपजिल्हाधिकारी ४२ घंट्यांमध्ये ३ भंगारअड्डे हटवू शकतो, तर फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी असे का करू शकत नाहीत ?

लोटे (खेड) येथील अरोमा इंटरमिडिएट्समध्ये भीषण आग

रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.

हानीभरपाई प्रकरणी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी न्‍यायाधीश स्‍वत: लोकन्‍यायालयात अपंग अर्जदाराकडे गेले !

रस्‍ते अपघातात मुलगा गमावलेल्‍या अपंग पालकांना हानीभरपाई देण्‍याचे प्रकरण शिवाजीनगर जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात आयोजित लोकअदालतीमध्‍ये निकाली काढले.

खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात: वैमानिक सुरक्षित !

संपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत !

गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.