|
बुलढाणा – येथे झालेल्या खासगी बसच्या अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अपघाताविषयी पोलिसांची दिशाभूल केल्याचा आणि टायर फुटल्याविषयी खोटे बोलल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कह्यात घेतले आहे. (मनुष्यवधाच्या प्रकरणी दानिश याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर बसगाडीने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात २५ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते.
Buldhana Bus Accident: Driver Danish Sheikh booked under IPC and Motor Vehicle Act, taken into custody along with conductor Arvind Jagtap
https://t.co/s8OUXd2AvR— OpIndia.com (@OpIndia_com) July 1, 2023
अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर चालकाने टायर फुटल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे कार्यालयाने सांगितले. घटनास्थळावरून रबराचे तुकडे मिळाले नाहीत. लोकांनी दिलेल्या माहितीवरून हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे दिसते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
संपादकीय भूमिका२५ जणांचे बळी घेऊनही खोटे बोलणार्या दानिश इस्लामईलची मनोवृत्ती जाणा ! |