जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.

जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. घायाळांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या सरकारी घराच्या फाटकाला चारचाकी वाहनाची धडक !

पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपी चालकाला अटक केली. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे का ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुणी घायाळ झालेले नाही.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार

ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.

कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्‍यांना १ सहस्र दंड !

रस्ते अपघात वाढले आहेत. यात दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही गोष्ट रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

पुणे येथे ब्रेक निकामी झालेल्या खासगी बसची ५ – ६ वाहनांना धडक !

कोंढव्यातील एन्.आय.बी.एम्. रस्त्यावर इशरत बाग परिसरात २१ मे या दिवशी भरधाव खासगी बसचे ब्रेक निकामी होऊन बसने ५ ते ६ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात

माझ्या अपघाताविषयीचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मला असंख्य लोक संपर्क करून माझी विचारपूस करत आहेत. आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही. कुठलीही चिंता नसावी. तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार.

अपघातात मृत्यू झालेल्यावर गुन्हा नोंद का ? 

‘कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील माणगाव-वाडोस मार्गावरून प्रवास करतांना आंबेरी येथे दुचाकीस्वार सीताराम भिकाजी शृंगारे (वय ६० वर्षे, रहाणार ओटवणे, सावंतवाडी) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.

पुणे शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष केल्‍याची याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट !

पुणे महानगरपालिकेच्‍या विरोधात शहरातील रस्‍त्‍यांची देखभाल, दुरुस्‍ती आणि शास्‍त्रीय पद्धतीने योग्‍य बांधकाम करण्‍यात दुर्लक्ष केल्‍याचा आरोप करत कनीज ए फातेमाह सुखरानी आणि पुष्‍कर कुलकर्णी यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयामध्‍ये जनहित याचिका प्रविष्‍ट केली आहे.

मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू  

यात ३ मुले आणि ९ महिला यांचा समावेश आहे. या अपघातात ३० जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.