१००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा चलनातून बाद करण्यावर रिझर्व्ह बँकेचा विचार !

१० रुपयांचे नाणे आणून १५ वर्षे झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजक यांनी त्याचा स्वीकार न करणे बँका आणि आर्.बी.आय. यांच्यासाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठे ओझे झाले आहे.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.

‘सुभद्रा लोकल एरिया’ बँकेची केंद्र सरकारकडे असलेली १६ कोटी रुपयांची गुंतवणूक सुरक्षित

रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत.

कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या २६४ बड्या थकबाकीदारांनी थकवले अनुमाने १ लाख कोटी रुपये !

कर्जफेडण्याची क्षमता असणार्‍यांकडून थकबाकी वसूल न करणारे आणि थकबाकीदार यांवर त्वरित अन् कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार्‍या सार्वजनिक बँका तपशील लपवून ठेवत आहेत ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्‍या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्‍या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.