गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला निर्णय !
सातारा, १९ मार्च (वार्ता.) – शहरासह परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्ययावत ‘सीसीटीव्ही कॅमेर्यां’ची आवश्यकता होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याविषयी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या निधीतून ३२ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ शहर आणि परिसरात बसवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. येत्या १५ दिवसांत कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.