९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री चालू !

दिवाळी आणि छटपूजा यांच्या कालावधीत पुष्कळ गर्दी होत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते; मात्र ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा चालू केली आहे.

लोणी काळभोर (पुणे) येथे विवाहितेशी लगट करणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !

धर्मांध सहजतेने मुली आणि विवाहित महिला यांची छेड काढतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक नाही, हे लक्षात येते. पोलीस धर्मांधांना वठणीवर कधी आणणार ?

पैठण तालुक्यातील मारुति मंदिरात चोरी !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकीन गावातील मारुति मंदिरात चोरी झाल्याची घटना ७ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. चोरट्यांनी मूर्तीवरील ७० सहस्र रुपयांचे दागिने चोरले आहेत.

गडदुर्गांचा ऐतिहासिक मागोवा घेणार्‍या  ‘सांगली जिल्ह्यातील गड-कोट-वाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन !

सांगली जिल्ह्यातील गडदुर्गांचा ऐतिहासिक संदर्भासह मागोवा घेणार्‍या श्री. महेश कदम लिखित ‘सांगली जिल्ह्यातील गड-कोट-वाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य टिळक स्मारक येथे नुकतेच करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २ कर्मचार्‍यांना लाच घेतांना अटक !

साध्या कामांपासून ते मोठी कामे करण्यासाठी लाच घेणार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवणे आवश्यक !

लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदार आणि ‘ट्रॅफिक वॉर्डन’ यांच्यावर गुन्हा नोेंद !

पोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा हाच एकमेव पर्याय !

आदिवासी सवलतींचा लाभ घेणार्‍या आयटीआयमधील धर्मांतरित विद्यार्थ्यांवर कारवाई होणार !

शिक्षणक्षेत्रात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही चौकशी व्हायला हवी !

दिवाळीत ए.पी.एम्.सी. परिसराला वाहतूककोंडीतून दिलासा !

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांनी यंदाच्या दिवाळीत ए.पी.एम्.सी.च्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहरात हत्तीच्या केसांचे दागिने विकणार्‍या सराफ पेढी चालकावर गुन्हा नोंद !

वन्यजीव कायद्यान्वये बंदी असलेल्या हत्तीच्या केसांचे ‘ब्रेसलेट’ आणि अंगठ्यांची विक्री केली.