चिखली (पिंपरी) येथील २ वर्षांच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी ३ आधुनिक वैद्यांसह २ परिचारिकांवर गुन्हा नोंद !

२ वर्षांच्या मुलाच्या पायाजवळ ‘वॉर्मर मशीन’ ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दिरांश गादेवार या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखली येथील खासगी रुग्णालयातील ३ आधुनिक वैद्यांसह २ परिचारिकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सनातन धर्म, प्राचीन संस्कृती यांवरील आरोपांना कलाकारांनी कलेद्वारे उत्तर द्यावे ! – चित्रपट अभिनेते योगेश सोमण

पुणे येथे ‘संस्कार भारती’च्या वतीने  ‘दीपसंध्या २०२४’ कार्यक्रम

दादरच्या बाजारपेठेतील कचर्‍याच्या स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांना काही घंटे राबावे लागते !

मुंबईत स्वच्छतेची ऐशी कि तैशी !

मुसलमान महिला उमेदवाराने मंदिरात पूजा केल्यावरून मौलानाला उठले पोटशूळ !

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसाठीच्या निवडणुका होत असतांना उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या ९ जागांवरही पोटनिवडणूक होत आहे.

मालवण शहरातील अनधिकृत फळविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

एस्.टी. बसस्थानकाजवळ फळविक्रेत्याकडून घडलेल्या प्रकारामुळे फळविक्रेत्यांविषयीची नागरिकांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवला आहे. फळविक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकतात.

‘एकल गीत’ रामायणात रोहित जोशी यांचे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव !

भाऊबीज, ३ नोव्हेंबर या दिवशी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या एकल गीत रामायण या सोहळ्यात श्री. रोहित जोशी यांनी एकाच दिवसात गीत रामायणातील ५६ गाणी गाऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले.

सध्याच्या काळात प्रत्येकाने योग्य साधनेसह नामजप केला पाहिजे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे मुलांवर संस्कारही आपोआप होत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्व परिस्थिती पालटली असून आज कुठेही हिंदु धर्माविषयी ज्ञान दिले जात नाही. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांना विज्ञानाची मर्यादा लक्षात..

दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?

रावेत (पुणे) येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मोटारचालकाला अटक !

अपघातानंतर मोटारचालक आदित्य हा घटनास्थळी न थांबता गाडीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्हींचे चित्रीकरण पडताळले. त्यातून आरोपीचा शोध लागला.

ठाणे येथे वाहनाच्या टपावरून फटाके फोडणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

निळकंठ भागात चालत्या वाहनांच्या टपावरून काही तरुणांनी फटाक्यांचा खोका हातात पकडून फटाके फोडले. याविषयाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.