गावठी पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना बार्शीत अटक !

बार्शी येथे रात्री पहारा करतांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ राऊंड यांसह २ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अल्पवयीन मुलाकडून आईच्या गळ्यावर चाकूने वार !

घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे.

‘राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगा’चे अधिवक्ता धर्मपाल मेश्राम यांची चेतावणी

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग राज्यातील दलित, आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोचवणे, तसेच त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी कार्य करते.

प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या !

मध्य रेल्वेच्या कर्तव्यावर असणार्‍या कर्मचार्‍यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू त्यांना परत केल्या आहेत. यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले.

दोडामार्ग तालुक्याचा आरोग्य सेवेचा प्रश्न खरच सुटला आहे का ?

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेसाठी जनतेला आवाज उठवावा लागतो, हे दुर्दैव !

‘एक्सेल’ आस्थापनावर दूषित पाणी नाल्यात सोडण्याचा गंभीर आरोप !

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होते’, असे म्हणणारी कथित पर्यावरणवादी मंडळी आता गप्प का ?
जनतेला मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

विक्रोळी येथे साडपल्या साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा !

विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक यांनी पकडलेल्या वाहनात साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्या. त्यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. या विटा ‘ब्रिंक्स’ आस्थापनाच्या वाहनातून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत होत्या.

पुणे येथील बुधवार पेठेतील कुंटणखान्यातून ५ तरुणींची सुटका !

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात धाड घालून ५ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमी बिश्वास, कुंटणखाना व्यवस्थापक विक्रम बिश्वास, विकास मंडोल आणि टॉनी मुल्ला यांना अटक केली आहे.

विनापरवाना प्रचाराचा ‘एअर बलून’ लावल्याने हॉटेलमालकावर गुन्हा नोंद !

फुरसुंगी येथील लॉजच्या गच्चीवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला ‘एअर बलून’ (हवा असलेला मोठा फुगा) लावून आचारसंहिता भंग केल्याबद्दल हॉटेलमालक अक्षय पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.