भाजप नगरसेवकावर महिला तलाठीला मारहाण केल्याचा आरोप !
नंदुरबार ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे.
नंदुरबार ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे.
कोरोना रुग्णांची परवड करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करा !
असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !
‘हा प्रस्तावित ‘इंटर मॉडल स्टेशन हब’ शहराच्या बाहेर नेऊन शहरातील झाडे आणि वनसंपदा सुरक्षित ठेवावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
वर्धा येथील सेवाग्राम येथे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ शाखेत बनावट बॉम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी योगेश कुबडे याला पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली.
श्री. बालराज कैरमकोंडा यांनी त्यांच्या सहकार्यांसह कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत यांचे ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर रविवार, ६ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘पासिंग’ करून न घेतल्याने गेले ५ ते ६ दिवस मुख्यालयात उभ्या करून ठेवल्या होत्या.
या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रफुल्ल घोरपडे, युवासेनेचे सचिन नागटीळक उपस्थित होते.