परतूर (जिल्हा जालना) येथील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’च्या वार्षिक स्नेहसंमेलनातील व्हिडिओ प्रसारित
काँग्रेसचे नेते तारिक सिद्दीकी यांच्या मालकीची शाळा
‘ट्रीनी’ या एक्स खात्याने व्हिडिओ प्रसारित केल्यावरून शाळेने गुन्हा नोंदवण्याची दिली धमकी
(गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा म्हणजे महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याची एकच शिक्षा आहे – शिरच्छेद)

जालना / नवी देहली – जालना जिल्ह्यातील परतूर शहरात असलेल्या ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यात शालेय विद्यार्थी बनावट तलवारी घेऊन ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ या पाकिस्तानी इस्लामी गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करतांना दिसत आहेत. यासमवेतच व्यासपिठाच्या मागील भागात पाकिस्तानी आतंकवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे गाणे महंमद पैगंबर यांच्या निंदेचा (ईशनिंदेचा) आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे शिरच्छेद करण्यास प्रवृत्त करते. ही घटना फेब्रुवारी २०२५ ची असून ‘ट्रीनी’ या प्रखर राष्ट्रवादी ‘एक्स’ खात्यावरून नुकताच त्याविषयीचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
शाळेचे अध्यक्ष अध्यक्ष तारिक सिद्दीकी यांना अर्धांगवायूचा झटका ?
या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी चालू असून १८ जूनच्या सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदवायचा कि अन्य कोणती कारवाई करायची, हे निश्चित होऊ शकेल. या वेळी त्यांच्याकडून शाळा व्यवस्थापनाचा संपर्क क्रमांक मागितला असता ते म्हणाले की, अध्यक्ष तारिक सिद्दीकी यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. या प्रकरणी ‘एक्स’ वापरकर्त्यांकडून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची अन् काही गैरप्रकार आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम साळी म्हणाले की, अन्वेषणास नुकताच आरंभला आहे. लवकरच अहवाल येईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल.
सी.बी.एस्.ई. अभ्यासक्रमांतर्गत शाळेची नोंदणी
(सी.बी.एस्.ई. : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)
विशेष म्हणजे परतूरच्या ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’ या शाळेची नोंदणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सी.बी.एस्.ई. अभ्यासक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे.
‘ट्रीनी’ या एक्स खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची शाळा व्यवस्थापनाची धमकी !या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने म्हटले की, या कार्यक्रमाच्या वेळी ‘एल्.ई.डी. स्क्रीन’ आणि व्यासपिठावरील दृश्य मांडणीचे दायित्व एका बाहेरील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले होते. व्यासपिठावरून दाखवल्या जाणार्या दृश्यांवर शाळेचे थेट नियंत्रण नव्हते. (अशा प्रकारे हास्यास्पद स्पष्टीकरण देणारे शाळा व्यवस्थापन त्याच्या मुलांवर कोणत्या प्रकारचे संस्कार करत असेल, याची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) ती दृश्ये ‘एर्तुग्रुल’ या तुर्की मालिकेतील होती. (ही मालिका इस्लामी प्रचारासाठी ओळखली जाते आणि त्यात शिरच्छेद करण्याची दृश्ये आहेत.) ‘ट्रीनी’ने हा व्हिडिओ प्रसारित केल्यावरून शाळा व्यवस्थापनाने ट्रीनीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली. यासंदर्भात सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘ट्रीनी’चे संपादक श्री. पियुष उपाध्याय यांच्याशी वार्तालाप साधला. या वेळी ते म्हणाले की, आम्ही हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर या शाळेला समाजातून मोठा विरोध होऊ लागला. यामुळे त्यांनी त्यांच्या यू ट्युब खात्यावरून त्या नृत्याचा व्हिडिओ तर पुसलाच (‘डिलीट’ केला), याखेरीज स्वत:चे यू ट्युब चॅनलही डिलीट केले. आम्हाला गुन्हा नोंदवण्याच्या धमक्या येत असल्या, तरी ही सत्य घटना असल्यामुळे आम्ही तो व्हिडिओ काढणार नाही. |
कोण आहे आतंकवादी मुमताज कादरी ?
मुमताज कादरी याने वर्ष २०११ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांची एके-४७ रायफलने २७ गोळ्या झाडून हत्या केली होती. पाकिस्तान न्यायालयाने त्याला दोषी ठरवून वर्ष २०१६ मध्ये फाशी दिली. त्यानंतरही पाकिस्तानमधील काही कट्टरपंथी गट अजूनही त्याचे उदात्तीकरण करतात. ५०० हून अधिक इस्लामी धर्मगुरूंनी तासीर यांच्या हत्येचे समर्थन केले होते.
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !
बहुसंख्य हिंदूंचा मंदिराशेजारी चर्च बांधण्यास विरोध असल्यास प्रशासनाने ते ऐकलेच पाहिजे ! – Madras High Court
गोमांस भक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा !
Lipstick Free Campus : केरळमध्ये ‘लिपस्टिक’मुक्त शाळा परिसर’ अभियानाला प्रारंभ !
श्रीराममंदिरात चोरी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही ! – Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati