सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बालराज कैरमकोंडा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित !  

सामाजिक कार्यकर्ते बालराज कैरमकोंडा

सोलापूर – येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बालराज कैरमकोंडा यांना ‘मैत्री फाऊंडेशन मुंबई’च्या वतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांना संगणकीय पत्राद्वारे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. येथे कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या काळात अनेक लोकांना वैद्यकीय साहाय्याची आवश्यकता होती. त्या वेळी ‘सेवा परमो धर्म:।’ या उक्तीप्रमाणे श्री. बालराज कैरमकोंडा यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

त्या काळात श्री. बालराज कैरमकोंडा आणि त्यांचे सहकारी यांनी गरजूंना कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती देणे, वाहन उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, यांसमवेत वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक ते साहाय्य केले होते.