छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या शुद्धीकरणास ३५० वर्षे पूर्ण !
हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून ३५० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेला १९ जूनला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक त्रिशताब्दी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना केले आहे.
🚩 350 Years of a Historic Milestone! 🚩
On 19 June 1676, Chhatrapati Shivaji Maharaj welcomed Swarajya’s first Commander-in-chief back into Hindu Dharma through 'Shuddhikaran' after his forced conversion by the Mughals.
Marking the 350th anniversary of this historic event,… pic.twitter.com/095bq0tTLJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2026
समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यासंदर्भात म्हणाले की,
आज ३५० वर्षांनंतरही हा इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे. विविध आमिषे, दबाव किंवा छळवणूक यांना बळी पडून लाखो हिंदु बंधू-भगिनी धर्मांतरित झाले आहेत. आजच्या काळात ‘लव्ह जिहाद’सारख्या सुनियोजित संकटाला बळी पडून अनेक हिंदु युवती परधर्मात ओढल्या जात आहेत. ‘ती गेली तर जाऊ द्या, आता तिचा आणि आमचा काही संबंध नाही’, या मानसिकतेचा हिंदु समाजाने त्याग केला पाहिजे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून फसवल्या गेलेल्या हिंदु मुलींना आणि बहिणींना पुन्हा सन्मानाने हिंदु धर्मात अन् समाजात सुरक्षित स्थान देण्यासाठी या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समस्त हिंदु समाज, संत आणि संघटना यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. जे बांधव आणि विशेषतः ज्या भगिनी मूळ प्रवाहात (हिंदु धर्मात) परत येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी आपण आपले दरवाजे अन् मने उघडी केली पाहिजेत.
हे ही वाचा → छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी ! |
नेताजी पालकर यांचा इतिहास
स्वराज्याचे पहिले सेनापती नेताजी पालकर यांना मोगलांनी कपटाने कैदेत टाकले होते. अत्यंत हालअपेष्टा करून त्यांना बळजबरीने मुसलमान बनवण्यात आले आणि त्यांचे नाव ‘महंमद कुली खान’ असे ठेवण्यात आले. अनेक वर्षे परधर्मात आणि परभूमीत राहूनही नेताजी यांचे मन स्वराज्यासाठी तळमळत होते. जेव्हा ते मोगलांच्या तावडीतून सुटून पुन्हा रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी आले, तेव्हा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार त्यांचे विधीवत् ‘शुद्धीकरण’ केले. जेधे शकावलीनुसार शके १५९८, आषाढ वद्य ४ (१९ जून १६७६) या दिवशी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात स्वीकारण्यात आले.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !