नागपूर येथे ‘अजनी वन’ वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह आम आदमी पक्षाचे ‘चिपको आंदोलन’ !

चिपको आंदोलन

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देशातील पहिले ‘इंटर मॉडल स्टेशन’ शहरातील अजनी भागात होणार आहे. त्यासाठी ४४.४ एकरमधील ४० सहस्रांहून अधिक झाडांची कत्तल केली जाणार आहे. ही वृक्षतोड होऊ नये, यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना एकत्र झाल्या असून त्यांनी ‘अजनी वन वाचवा’, अशी घोषणा देत ५ जून या दिवशी येथील रेल्वे-मेन्स शाळेजवळ ‘चिपको आंदोलन’ केले.

‘अजनी वन हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून शहरातील ऑक्सिजनची आवश्यकता भागवते. अशा वेळी विकासाच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करणे योग्य नाही’, असे मत आम आदमी पक्षाचे संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले. ‘हा प्रस्तावित ‘इंटर मॉडल स्टेशन हब’ शहराच्या बाहेर नेऊन शहरातील झाडे आणि वनसंपदा सुरक्षित ठेवावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.