न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेला पाठवलेल्या पत्रात फ्रान्सने सुरक्षा परिषदेतील व्यापक सुधारणांसाठी पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित केला. त्याने भारतासमवेतच जर्मनी, ब्राझिल आणि जपान यांनाही कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याची मागणी केली. तसेच आफ्रिका खंडासाठी २ स्वतंत्र जागांची मागणी केली. यामुळे या खंडावर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाचे निवारण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल, असे फ्रान्सने म्हटले आहे. याच आठवड्यात युरोपीय देश स्लोवाकियानेही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी समर्थन दिले होते.
फ्रान्सने सुरक्षा परिषदेतील सदस्यांची संख्या २५ पर्यंत वाढवण्याची मागणी केली, जेणेकरून प्रतिनिधित्व आणि परिणामकारकता यांच्यात संतुलन राखले जाऊ शकेल. सध्या सुरक्षा परिषदेत १५ सदस्य आहेत. त्यांपैकी ५ कायमस्वरूपी सदस्य – फ्रान्स, अमेरिका, चीन, रशिया आणि ब्रिटन – आहेत, तर १० सदस्य दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात.

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?