थिरूवनंतपूरम् (केरळम्) – कोल्लम जिल्ह्यात शाळा परिसर सौंदर्यप्रसाधनांपासून मुक्त ठेवण्याचे अभियान प्रारंभ करण्यात आले आहे. याचा प्रारंभ जिल्हा स्तरावर मय्यानाड उच्च माध्यमिक शाळेपासून झाला, ज्याला आता जिल्ह्याचा पहिला ‘लिपस्टिक-फ्री कॅम्पस’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. केरळम्च्या बाल कल्याण समितीने प्रारंभ केलेल्या या अभियानाचा उद्देश विद्यार्थिनींना सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणार्या रासायनिक घटकांपासून वाचवणे आणि मुलींमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेचा उद्देश मुलींना त्वचारोगांच्या धोक्यापासून वाचवणे हा आहे.
🚨 Kerala’s First ‘Lipstick-Free Campus’! 💄🛑
A commendable initiative by Mayyanad Higher Secondary School in Kerala, launched with the support of the Child Welfare Committee, to raise awareness about the health risks posed by toxic heavy metals often found in low-cost… pic.twitter.com/S8XLijtjV0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
पर्यावरणाला हानी पोचवणारी सर्वांत घातक गोष्ट !
‘लिपस्टिक-फ्री कॅम्पस’ मोहिमेचे उद्घाटन करतांना कवी कुरिपुझा श्रीकुमार म्हणाले की, प्रत्येक माणूस जन्मतःच सुंदर असतो; मग आपल्याला सौंदर्यप्रसाधनाची (कॉस्मेटिक) आवश्यकताच काय ? बाह्य दिखाव्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते. पर्यावरणाला हानी पोचवणार्या गोष्टींमध्ये अत्तरांसह सौंदर्यप्रसाधने सर्वाधिक घातक आहेत.
केमिकल युक्त कॉस्मेटिक उत्पादनांमुळे कर्करोगाचा धोका
राज्याच्या आरोग्य विभागाच्या चेतावणीनुसार बाजारात मिळणार्या स्वस्त कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये विषारी जड धातू असतात, जे मुलांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचे कारण ठरू शकतात. हे विषारी रसायन विद्यार्थिनी वापरत असलेल्या सामान्य लिपस्टिकमध्ये आढळतात, तर मेकअप किटमध्ये पारा आणि कॅडमियम यांसारखे धोकादायक घटक सापडले आहेत.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !