विमानतळ परिसरात मातमला अनुमती दिल्याप्रकरणी अनेकांकडून टीका !
(मातम म्हणजे मृत्यू, वाईट घटना किंवा बलीदानाच्या स्मरणार्थ छातीवर हात मारून शोक सार्वजनिकरित्या व्यक्त करण्याची मुसलमानांची पद्धत)

मुंबई – एका विमानतळाच्या परिसरात शिया समाजातील काही सदस्यांनी मातम केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले. हा व्हिडिओ नेमका कुठल्या विमानतळावरचा आहे ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि जर तो मुंबई विमानतळ परिसरातील असेल, तर हा प्रकार नेमका कधी घडला ?, त्यासाठी अधिकृत अनुमती घेण्यात आली होती का ?, यांविषयी विमानतळ प्रशासनाने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन प्रसारित केलेले नाही.
🚨 A video showing Shia community men performing matam outside the entry gates of Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) has sparked a row.
Bajrang Dal has alleged misuse of public space and demanded police action over the incident. pic.twitter.com/47U0LRws2E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
१. मातम ही प्रामुख्याने शिया मुसलमान समाजात पाळली जाणारी शोक व्यक्त करण्याची धार्मिक परंपरा आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकार्यांनी सातव्या शतकातील कर्बला युद्धात दिलेल्या बलीदानाच्या स्मरणार्थ अशा प्रकारे दुःख आणि एकात्मता व्यक्त केली जाते.
२. विमानतळ परिसरात अशा प्रकारांना अनुमती कशी दिली गेली ?, असा प्रश्न अनेकांनी सामाजिक माध्यमांत उपस्थित केला आहे. सर्वांनी अधिक कठोर सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक