उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर

(जय भीम जय मीम ही दलित आणि मुसलमान यांच्यातील कथित सामाजिक अन् राजकीय युती दर्शवण्यासाठी दिली जाणारी घोषणा आहे. या माध्यमातून दलितांना हिंदूंपासून तोडण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे.)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याशी संबंधित प्रकरणांत सर्वाधिक २ सहस्र १६० गुन्हे यादव समुदायाविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत. दुसरीकडे १ सहस्र ९८३ गुन्ह्यांसह मुसलमान दुसर्‍या क्रमांकावर आहेत. याव्यतिरिक्त १ सहस्र ६०१ ब्राह्मण समाजातील आणि १ सहस्र ६९८ क्षत्रिय समाजातील लोकही या प्रकरणांत आरोपी आहेत.

४ महिन्यांत ४ सहस्र ७४१ गुन्हे आणि १४ सहस्र ६७२ आरोपी

जानेवारी ते एप्रिल २०२६ या काळात या कायद्यांतर्गत एकूण ४ सहस्र ७४१ गुन्हे नोंदवण्यात आले. या प्रकरणांच्या अन्वेषणानंतर एकूण १४ सहस्र ६७२ लोकांना आरोपी करण्यात आले. ही आकडेवारी राज्यातील सर्व जिल्हे आणि विभाग यांच्याकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारावर सिद्ध करण्यात आली आहे. ही आकडेवारी गुन्ह्यांच्या नोंदींवरून सिद्ध करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • याविषयी दलितांवरील राजकारण करणारे पक्ष गप्प का आहेत ?
  • ‘जय भीम जय मीम’ची घोषणा देणार्‍यांना आता यावरून जाब विचारला पाहिजे !