
पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मर्डन शहरात १७ जून या दिवशी एका गुरुद्वारामध्ये शीख सेवादार दांपत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मर्डनचे जिल्हा पोलीस अधिकारी मसूद अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गुरुद्वारामध्ये घुसून गोळीबार केला. यात सेवादार जगन्नाथ आणि त्यांची पत्नी आसमा वांती यांचा मृत्यू झाला. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🚨 A Sikh husband and wife, serving as sevadars, were murdered after intruders entered a Gurdwara in Peshawar, Pakistan.
Why are Khalistani supporters in India, Canada, and Pakistan silent on this brutal killing of Sikhs?
Selective outrage raises serious questions.#Sikhs… pic.twitter.com/Fhi5KLWYSJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2026
खैबर पख्तूनख्वा विधानसभेचे आमदार सुरेश कुमार यांनी मारेकर्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली असून पोलिसांना अन्वेषणात प्रगती दाखवण्यासाठी २४ घंट्यांची समयमर्यादा दिली आहे. या आक्रमणाचा निषेध करतांना सुरेश कुमार म्हणाले की, परिसरात सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस तैनात असूनही अशी घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. त्यांनी या प्रकरणाच्या सर्व पैलूंची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
कुमार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून गोळा केलेल्या सीसीटीव्ही पुराव्यांच्या व्यवस्थापनावरही चिंता व्यक्त केली. त्यांनी असा दावा केला की, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर अत्यंत निष्काळजीपणे हटवण्यात आला, ज्यामुळे पुराव्यांचे जतन आणि अन्वेषण यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी मर्डनचे जिल्हा पोलीस अधिकारी, मर्डन क्षेत्राचे प्रादेशिक पोलीस अधिकारी आणि खैबर पख्तूनख्वाच्या पोलीस महानिरीक्षक यांना या घटनेची सखोल चौकशी सुनिश्चित करण्याचे आणि निष्काळजीपणा दाखवणार्या अधिकार्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले.
…तर पेशावर, इस्लामाबाद येथे निदर्शने करणार !
सुरेश कुमार यांनी चेतावणी दिली की, जर २४ घंट्यांच्या आत संशयितांना अटक झाली नाही किंवा अन्वेषणात महत्त्वपूर्ण प्रगती झाली नाही, तर मर्डन, पेशावर आणि इस्लामाबाद येथे शांततापूर्ण निदर्शने केली जातील.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून निषेध !
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. धामी म्हणाले की, गुरुद्वारा साहिबसारख्या पवित्र धार्मिक स्थळामध्ये घुसून निष्पाप लोकांची हत्या करणे, हा माणुसकीविरुद्धचा गुन्हा आहे. या घटनेमुळे केवळ शीख समुदायामध्येच नव्हे, तर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक