सातारा जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणार्या तृतीयपंथीयांवर गुन्हा नोंद !
जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितल्यामुळे चिडून तृतीयपंथीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितल्यामुळे चिडून तृतीयपंथीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे.
कोरोनामुळे महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र वाढले नाहीत. याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा व्ययही गगनाला भिडतांना दिसत आहे.
जनहिताचे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसैनिकांना केले.
महिला पोलीस उपनिरीक्षकांशी अशा प्रकारे वागणारी व्यक्ती अन्य वेळी इतरांशी कशी वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा !
गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण ! बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
समुदाय आरोग्य अधिकार्याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. याविषयीचे निवेदन माण पोलिसांना देण्यात आले आहे.
निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करत चढ्या दराने स्वत:च्या ठेकेदाराला कामे दिल्याचा आरोप नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी केला आहे.
बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.