दुधाला किमान हमीभाव न दिल्यास गायी-म्हैशी यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्याची शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समितीची चेतावणी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – कोरोनामुळे महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र वाढले नाहीत. याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा व्ययही गगनाला भिडतांना दिसत आहे. सध्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर केवळ २० रुपयांच्या आत भाव मिळत आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना दुधाला किमान हमीभाव देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अन्यथा या मागणीसाठी गायी-म्हैशी यांसह मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिली आहे.