
कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व करतांना अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसैनिकांना केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १२ ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी शिवसेनेची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीत जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेनेचे हर्षल सुर्वे, मंजित माने, करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, विराज पाटील यांसह
विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास