बिबट्याच्या आक्रमणात राजापूर (जि. रत्नागिरी) येथील नायब तहसीलदार दीपाली पंडीत घायाळ
बिबट्या आक्रमण करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारला असून दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.