एकमेवाद्वितीय हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’

हिंदु राष्ट्राचा ध्वज भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’

शिकण्याच्या वृत्तीचा होणारा लाभ !

‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला इतरांचे दृष्टीकोनही कळतात.’

कुठे श्रेष्ठ हिंदु धर्म आणि कुठे पाश्‍चात्त्य विचारसरणी !

‘हिंदु धर्म मन मारायला, नष्ट करायला, मनोलय करायला शिकवतो, तर पाश्‍चात्त्य विचारसरणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करायला शिकवते !’

राज्यकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवणे हे भारताच्या दु:स्थितीचे एक कारण !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांनी केवळ बौद्धिक शिक्षणाच्या माध्यमातून वैद्य, अभियंते, वकील तयार केले; पण यांना साधना शिकवून ‘संत’ होण्याचे शिक्षण दिले नाही. याचमुळे आज देशद्रोहापासून लाचखोरीपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांनी हा देश व्यापलेला आहे.’ 

अध्यात्मप्रसार करतांना लक्षात ठेवण्याची गोष्ट !

‘देवाचे अस्तित्वच न मानणारे कधी ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा विचार करू शकतील का ? साधकांनी अध्यात्मप्रसार करतांना अशांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये !’ 

साधनेविना जीवन पशुतुल्य !

‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’ 

मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’

आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंचे महत्त्व !

‘आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी लहानपणी मुलांना अ, आ, इ… हे शिकवले नसते, तर मुलांना पुढे शिकता आले नसते. त्याप्रमाणे अध्यात्मात गुरु आपल्याला जे शिकवतात, ते पुढे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे असते.’ 

हिंदु धर्मग्रंथ हे आधुनिक विज्ञानापेक्षाही श्रेष्ठ !

‘आधुनिक विज्ञानाच्या उत्पत्तीपूर्वीच हिंदु धर्मग्रंथ हे प्रगतावस्थेत होते. हल्ली विज्ञानाने जे शोध लावले, त्यांचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लावला होता. त्यांचा उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. या ग्रंथांमध्ये अजूनही अनेक वैज्ञानिक सूत्रे सांगितलेली आहेत, की ज्यांच्यापर्यंत आधुनिक विज्ञानाला पोचता आलेले नाही.’