हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळेच आनंदप्राप्ती शक्य !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’

केवळ प्रवचने नकोत, हेही करा !

‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’

सर्वच क्षेत्रांतील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी !

‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’

राजकारणी आणि संत यांच्यातील भेद !

‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’

अन्य धर्मीय हिंदु धर्माकडे आकर्षित का होतात ?

‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’

नतद्रष्ट झालेले हिंदू !

‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’

संप्रदायांच्या प्रमुखांनी हे लक्षात घेतले पाहिजे !

‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्‍वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’

हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेनेच आनंदप्राप्ती होते !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’

आजारावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी उपाय करणे आवश्यक !

‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’

हिंदूंनाे, हे जाणा !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’