आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून भक्तीमय वातावरणात स्वागत

येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले.

पुणे येथील कात्रज परिसरात २१ लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त !

अमली पदार्थ विक्रीचे प्रकार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार आहेत ?

Pooja Khedkar UPSC : यू.पी.एस्.सी.ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रहित केली !

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवा आयोगाने) (UPSC) रहित केली आहे. त्यांना यापुढे आयोगाकडून घेण्यात येणार्‍या कोणत्याही परीक्षेस बसता येणार नाही.

दरड कोसळल्याने सिंहगडावरील पर्यटन बंद !

पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या सिंहगडाचे पर्यटन काही दिवस बंद केले आहे. दगड-मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

पुणे शहरातील नदीपात्रांमध्ये होणार्‍या अतिक्रमणांमुळे नदीला पूर ! – माजी खासदार डॉ. वंदना चव्हाण

नदीपात्रामध्ये जुन्या इमारती पाडल्यानंतर राडारोडा टाकला जात आहे, त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. या माध्यमातून पुणेकरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

पुणे सीमा शुल्क विभागाकडून वाघांची कातडी विकणार्‍या टोळीला अटक !

वाघाची शिकार करून कातडी विकणार्‍या टोळीला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत अटक केली आहे. या टोळीतील ६ जणांना कह्यात घेतले आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे.

फर्ग्युसन रस्ता (पुणे) येथे संत तुकाराम महाराज पादुका मंदिरातून रोख रकमेची चोरी !

या प्रकरणी ‘संत तुकाराम महाराज पादुका मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त रमेश शिरोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पुणे येथे एका पॅनकार्डाचा वापर करून ३०० आस्थापनांतील कर्मचार्‍यांनी चुकवला प्राप्तीकर !

याविषयी संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना लक्षात आले नाही का ?

संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचे नरसी नामदेव (हिंगोली) येथून मलेशियाला प्रस्थान !

संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. हिंगोलीमधील नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराज दिंडीचे २९ जुलैला मुंबई मार्गे विमानाने मलेशियाला प्रस्थान झाले

‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात पुणे येथील दहावीत शिकणार्‍या मुलाची आत्महत्या !

आई-वडील दुसर्‍या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्री १ वाजता मुलाची आई जागीच होती. त्याच वेळी सोसायटीच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक मुलगा घायाळ अवस्थेत खाली पडल्याचा संदेश आला.