पुणे – फर्ग्युसन रस्त्यावरील संत तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटीतून चोरट्यांनी ८ सहस्र रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना २८ जुलैच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी ‘संत तुकाराम महाराज पादुका मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त रमेश शिरोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. चोरट्यांनी २८ जुलैच्या मध्यरात्री मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीचे कुलूप उचकटून ८ सहस्र रुपये चोरून नेले. दुसर्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याविषयी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. मंदिर परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे ! |