व्यावसायिकाकडे ५ लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकारास अटक !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगत व्यावसायिकाकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्रकार अर्जुन शिरसाट यांना १६ सप्टेंबरच्या रात्री अटक केली.

पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट !

मुलांना मनुष्य जन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षण दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत.

जेजुरी देवस्थानाची ११३ एकर भूमी त्यांना मिळणार !

सरकारीकरण झालेली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांची स्थिती काय होऊ शकते ?, हे या उदाहरणातून लक्षात येते. यामुळे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी; मात्र संकलन केंद्रावर तुडुंब गर्दी !

कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्‍या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ?

गणेशोत्सवात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याचे पोलिसांपुढे आव्हान !

गौरी विसर्जनानंतर होणार्‍या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.

चाकण (पुणे) येथे विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकांकडे १५ लाखांची खंडणी मागितली !

समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !

महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !

होमिओपॅथी उपचारपद्धतीला सर्वमान्यता मिळायला हवी ! – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरित परिणाम होतात; परंतु होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणतेही शस्त्रकर्म न करता किंवा इंजेक्शन न देता केवळ पांढ‍र्‍या गोळ्या प्रभावी ठरतात.

‘बोगस शिक्षक भरती प्रकरणी’ जिल्हा परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट; गुन्हा नोंद !

बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे