चाकण (पुणे) येथे विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकांकडे १५ लाखांची खंडणी मागितली !

समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे ! – संपादक 

पुणे, १५ सप्टेंबर – विनयभंग केल्याची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी चाकणचे (ता. खेड) नगरसेवक किशोर शेवकरी यांच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाकणचे माजी उपसरपंच, १ पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर १३ सप्टेंबर या दिवशी चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शेवकरी यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, ‘व्हॉट्सॲप चॅटिंग’ पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.