खडकवासला (पुणे) धरण साखळीतील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली !

परिणामी खडकवासला धरणातून ८४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. या धरणांची १०० टक्के पातळी कायम ठेवत, पावसाचे पडणारे पाणी नदीत सोडून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे भाग पडले !

हिंदुबहुल देशात हिंदूंनाचा त्यांचे सण धर्मशास्त्रानुसार साजरे करता न येणे यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्रत्येक वर्षी भाविकांची अशा प्रकारे असुविधा निर्माण करून महापालिका प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे ?

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशभक्तांनो, रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे देवतेचे विडंबन आहे, हे लक्षात घ्या ! भक्तीभावाने पूजलेल्या श्री गणेशमूर्तीचे रसायनाच्या पाण्यामध्ये विसर्जन न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

डी.एच्.एफ्.एल्. आस्थापनाकडून नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या आस्थापनाने नीलम राणे (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी) आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.

पुणे येथे नागरिक घाटांवरून विसर्जन न करताच परतले !

पुण्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून कोणतीही सोय नाही !

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेश भक्ताकडून १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने विविध प्रकारचे पाचू असलेला, तसेच रेखीव नक्षीकाम केलेला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीला हा मुकुट घालण्यात आला.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘हिंदुत्व, ‘हिंदुइजम्’ आणि हिंदु धर्म यांत काही भेद आहे का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !

हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

या कार्यक्रमामध्ये ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा आणि ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनी मार्गदर्शन केले.

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते होणार श्रींची प्राणप्रतिष्ठापना !

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

पुणे येथील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या ५ गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना १० सप्टेंबर या दिवशी दुपारपर्यंत होणार आहे.