पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव द्यावे !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मागणी !

संत तुकाराम महाराज

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी राज्यशासनाने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका पुणे शहराचे खासदार तथा नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]