पुणे – शहरातून हत्येचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साहाय्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. हत्या झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्षे एवढे आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खराडी परिसरात ‘जेनी लाईट कन्स्ट्रक्शन’चे काम चालू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात-पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही.
संपादकीय भूमिका
|