कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून बेंगळुरू येथे

कर्नाटक विधानसभा अधिवेशन

बेळगाव – कर्नाटक राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात बेंगळुरू येथे होणार आहे. हे अधिवेशन बेंगळुरू येथे होत असल्याने यंदाही मोठा व्यय करून बांधण्यात आलेला बेळगाव येथील विधान सौध (अधिवेशन घेण्यासाठी बांधण्यात आलेले भवन) रिकामाच रहाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर कायदामंत्री मधूस्वामी म्हणाले की, नवा विजयनगर जिल्हा बळ्ळारी जिल्ह्यात विभागला जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यासाठी एक उपसमिती गठीत केली जाणार आहे. तसेच राज्यातील मराठा समाजासाठी मराठा समुदाय विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.