‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
‘साधनेचे प्रयत्न होत नसतात, त्या वेळी आपला उत्साह अल्प असतो. साधनेत मनाचा सहभाग पुष्कळ असला पाहिजे. मनात उत्साह असला, तर प्रत्येक कृती योग्य वेळीच होते. मनाच्या स्थितीचा परिणाम कृतीवर होतो आणि सवलत घेणे, चालढकलपणा अन् निरुत्साह वाढतो.