संपादकीय : राष्ट्रघातकी विचारांना पायबंद कधी ?
आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे !
आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे !
७ मे या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकपुरस्कृत पहलगाम आक्रमणाचा सूड घेतला. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिआक्रमण करतांना थेट सीमावर्ती भागात नागरी वस्त्यांवर आक्रमणे केली आणि क्षेपणास्त्रे टाकली. ती सर्व भारताच्या ‘एस्-४००’ अर्थात् ‘सुदर्शन’ या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली. याखेरीज ‘एफ्-१६’ विमानेही पाडली. भारताच्या या हवाई संरक्षण यंत्रणेचा परिणाम इतका आहे की, भारताच्या दिशेने येणारे कोणतेही शस्त्र, … Read more
कोणतेही युद्ध किंवा लष्करी कारवाई ही शांत चित्ताने आणि बुद्धी स्थिर ठेवून करावी लागते. त्यासाठी धूर्तपणे योजना आखावी लागते. या सर्वांसाठी पुरेसा वेळही लागतो.
‘न्यूयॉर्क’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटगॉन’चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकला त्याची लायकी दाखवली !
प्रत्यक्ष युद्धासह भारताने व्यापार युद्ध लढून तुर्कीये आदी भारतद्वेषी देशांना अद्दल घडवणे आवश्यक !
पाकिस्तान आतंकवाद्यांना पोसतो आणि ठार झाल्यानंतरही त्याच्या नातेवाइकांना हानीभरपाई देतो, हे यातून उघड झाले आहे. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला २० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देते, हे आश्चर्यजनक आहे.
पाककडे दाखवण्यासारखे काहीच नाही; कारण असे काहीच झालेले नाही. पाक जगातील सर्वांत खोटारडा देश आहे. त्याचा खोटेपणा त्याच्याच देशाचे पत्रकार उघड करून त्याचे धिंडवडे काढत आहेत !
भविष्यात भारतीय सैनिक भगवान शिवाप्रमाणे प्रलयंकारी रूप धारण करून शत्रूवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटणार नाही !
‘७.५.२०२५ या दिवशी रात्री भारताने पाकिस्तानातील ९ आतंकवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. ८.५.२०२५ या दिवशी पाकिस्तानने भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.