भारताच्या कारवाईत मसूद अझहरचे १४ नातेवाईक झाले होते ठार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचे कुटुंब ठार झाले आहे. पाक सरकार त्याला साहाय्य म्हणून सरकारी निधीतून एकूण १४ कोटी रुपये देणार आहे. मसूदच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक मृत्यूसाठी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने भरपाई घोषित केली आहे. पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जैशने मुख्यालय होते, जे भारताने उद्ध्वस्त केले. येथेच मसूदचे नातेवाईक रहात होते.
संपादकीय भूमिकापाकिस्तान आतंकवाद्यांना पोसतो आणि ठार झाल्यानंतरही त्याच्या नातेवाइकांना हानीभरपाई देतो, हे यातून उघड झाले आहे. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला २० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देते, हे आश्चर्यजनक आहे. भारताने यावरून आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला जाब विचारला पाहिजे ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !