७ मे या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकपुरस्कृत पहलगाम आक्रमणाचा सूड घेतला. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिआक्रमण करतांना थेट सीमावर्ती भागात नागरी वस्त्यांवर आक्रमणे केली आणि क्षेपणास्त्रे टाकली. ती सर्व भारताच्या ‘एस्-४००’ अर्थात् ‘सुदर्शन’ या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली. याखेरीज ‘एफ्-१६’ विमानेही पाडली. भारताच्या या हवाई संरक्षण यंत्रणेचा परिणाम इतका आहे की, भारताच्या दिशेने येणारे कोणतेही शस्त्र, लढाऊ विमान, ड्रोनही पाडता येते. पाकिस्तान प्रारंभीपासून अणुबाँब आक्रमणाची धमकी देत आहे; मात्र आता अणुबाँबची धमकी पोकळ ठरणार आहे. अणुबाँबही निष्प्रभ करण्याची क्षमता या प्रणालीकडे आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने आपल्या अत्याधुनिक ‘मल्टी-लेयर्ड काऊंटर ड्रोन’ आणि ‘एअर डिफेन्स ग्रिड’ची यशस्वी चाचणी केली. या ग्रिडने शत्रूने डागलेली क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि लढाऊ विमाने यांना नुसते ट्रॅकच केले नाही, तर वेळीच नष्टसुद्धा केले. या यंत्रणेने कमाल केली आणि पूर्ण सिद्धता करून आलेल्या शत्रूला पाणी पाजले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जबरदस्त प्रदर्शन केले. ही यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘रिअल टाइम कॉर्डिनेशन’वर आधारित आहे. देशाच्या सर्व सीमा कुठल्याही हवाई धोक्यापासून रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. या हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती घेऊया.

१. पहिली ‘लेअर काऊंटर ड्रोन’ आणि ‘मॅनपॅडस’
सीमावर्ती भागात २०० किलोमीटरच्या आत ‘अँटी ड्रोन सिस्टम’ आणि ‘मॅनपॅडस’ यांसारखी IGLA, LLAD तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा लहान आणि अल्प उंचीवरून उडणार्या लक्ष्यांना भेदण्यास सक्षम आहे.
२. दुसरी ‘लेअर प्वाईंट एअर डिफेन्स’ आणि ‘एस्.आर्.-एस्.ए.एम्.’
या लेयरमध्ये ‘एस्.आर्.-एस्.ए.एम्.’ (शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स) उदाहरणार्थ ‘स्पायडर’ आणि ‘एस्.ए.एम्.ए.आर्.’ या प्रणाली तैनात आहेत. वेगात येणार्या हवाई धोक्यांना या यंत्रणेद्वारे नष्ट करता येते.
३. तिसरी ‘लेअर ‘एम्.आर्.एस्.ए.एम्.’ (बार्क-८)
ही यंत्रणा मध्यम अंतरावरील क्षेपणास्त्रांची आक्रमणे आणि लढाऊ विमानांना रोखण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. इस्रायलच्या सहकार्याने ‘एम्.आर्.एस्.ए.एम्.’ प्रणाली बनवण्यात आली आहे.
४. ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणाली
म्हणजेच ‘सुदर्शन’ ही रशियाच्या ‘एन्पीओ अल्माझ’ या आस्थापनाने विकसित केलेली एक फिरती भूमीवरून हवाई संरक्षण यंत्रणा आहे. ही पूर्वीच्या ‘एस्-३००’ क्षेपणास्त्र प्रणालीची पुढील आवृत्ती आहे. वर्ष २००७ मध्ये रशियाने ‘एस्-४००’ यंत्रणेला सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट केले होते. रशिया सध्या ‘एस्-५००’ विकसित करत आहे.
‘एस्-४००’ (सुदर्शन) ही यंत्रणा ५ मिनिटांत तैनात करता येणारी ही एक अत्यंत गतिमान क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी जॅमिंगलाही प्रतिरोधक आहे. ‘एस्-४००’ प्रणाली ४०० किलोमीटरपर्यंत आणि ३० किमी उंचीवरील विमान, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे अन् आंतरखंडीय क्षेपणास्त्रे यांसारख्या हवाई आक्रमणांना हवेतच नष्ट करू शकते. ही यंत्रणा एकाच वेळी ३०० लक्ष्यांचा मारा रोखू शकते आणि ३६ लक्ष्यांना नष्ट करू शकते. ‘एस्-४००’मध्ये ‘४० एन् ६ ई (४०० किमी रेंज)’, ‘४८ एन् ६ ई ३ (२५० किमी)’, ‘९ एम् ९६ ई २ (१२० किमी)’ आणि ‘९ एम् ९६ ई (४० किमी)’, अशी ४ प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. ‘एस्-४००’मध्ये ३६० अंश देखरेख आणि ‘काऊंटर स्टील्थ’ क्षमतांसाठी ‘९६ एल् ६ इ’सारखे प्रगत रडार आहेत.
५. भारताने विकसित केलेली आणि करत असलेली प्रणाली
अ. ‘कुश’ प्रकल्प : भारत एक स्वदेशी क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणाली ‘प्रकल्प कुश’ विकसित करत आहे. लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये भूमीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे किंवा ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ समाविष्ट करण्याची क्षमता आहे. ‘कुश’ प्रकल्पाचे नेतृत्व भारताची ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटना’ करत आहे. ‘कुश’ १५० किमी ते ३५० किमीपर्यंतच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांसह एक स्तरित संरक्षण प्रणाली प्रदान करील.
आ. ‘आकाश-एल्.७०’ : भारतात उत्पादित करण्यात येणार्या यंत्रणेमध्ये भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटना’ने ही यंत्रणा विकसित केली आहे. भूमीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली असलेल्या ‘आकाश-एल्.७०’ने पाकिस्तान विरुद्धच्या ७ मे या दिवशी झालेल्या सैनिकी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. एका संरक्षण प्रणालीची किंमत सुमारे अडीच कोटी असून त्याच्या एका युनिटमध्ये एक रडार आणि ४ लाँचर आहेत.
इ. ‘रडार आणि सर्विलांस सिस्टम’ : यात विभिन्न स्तरांतील रडार आहेत. उदाहरणार्थ ‘एल्.आर्.’, ‘एम्.पी.आर्.’ आणि ‘एच.पी.आर्’. २४ घंटे या यंत्रणांचे सीमेवर लक्ष्य असते. शत्रूची कुठलीही हालचाल वेळीच या रडार्सकडून टिपली जाते.
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !