
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील आतंकवादाच्या विरोधात राबवलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम देश-विदेशांत पुष्कळ गाजली आणि अजूनही गाजत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आतापर्यंत भारतीय सैनिकांनी शेकडो आतंकवाद्यांना ठार केले. त्यामुळे देशप्रेमी भारतीय मोहिमेचे समर्थन करत आहेत. ‘एका नाण्याला २ बाजू असतात’, त्याप्रमाणे या मोहिमेची दुसरी बाजू अर्थातच ती टीकेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काही केले आणि टीका झाली नाही, तरच नवल ! मोहिमेच्या प्रारंभानंतर पहिली टीका केली, ती म्हणजे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ! ते म्हणाले, ‘‘युद्ध हे शस्त्रास्त्र आणि दारूगोळे यांनी जिंकले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देऊन सरकारने भावनांनी युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा लाभ होणार नाही.’’ समोरच्यांच्या भावनांवर बोट ठेवू पहाणारे पृथ्वीराज चव्हाण यांना ‘एखादी घटना घडल्यावर तात्काळ त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सवयच आहे’, हे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या आणि त्याही आधीपासूनच्या अनेक प्रसंगांपासूनच सर्व जनता पहात आहे. ही अशी भावनिकता अधिकच धोकादायक म्हणावी लागेल. सैन्य कारवाईनंतर त्यावर बोट ठेवून अभ्यासाविना तात्काळ व्यक्त केलेले विधान भावनिकच ठरते, हे बहुधा चव्हाण यांना ठाऊक नसावे. बिहारमधील काँग्रेस युनिटचे प्रभारी राजेश राठोड म्हणाले, ‘‘ही मोहीम अपूर्ण आहे. आतंकवाद्यांना ठार मारले कि पकडले, याची माहिती दिली गेली नाही.’’ प्रत्यक्षात सैन्यदलाने केलेल्या कारवाईच्या अंतर्गत सर्वच छायाचित्रे आणि व्हिडिओही प्रसारित करण्यात आले आहेत; पण ते म्हणतात ना, ‘जित्याची सवय मेल्याखेरीज जात नाही’, त्याप्रमाणे अभ्यास न करता बिनबुडाची वक्तव्ये करणे, हे काँग्रेसला चांगलेच जमते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या फुटीरतावादी संघटनेच्या एकाने आत्मघातकी बाँबस्फोटाद्वारे केली. त्यांच्या हत्येनंतर सादर केलेल्या अंतिम अहवालातील निष्कर्षात म्हटले आहे, ‘माजी पंतप्रधानांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती; परंतु काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या व्यवस्थांमध्ये व्यत्यय आणला आणि सुरक्षा मोडली.’ सैन्यदलाच्या कारवाईविरोधात टिवटिव करणारी आताची मंडळी राजीव गांधी हत्या प्रकरणाविषयी बोलणे मात्र टाळतात, हे भारतियांनी लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फोफावलेल्या खलिस्तानवादाचेही मूळ पाकिस्तान आहे; पण त्याविरोधात आवाज उठवलाच जात नाही; कारण पाकप्रेम अगदी ठासून भरलेले आहे. देशप्रेमींनी काही केले की, देशद्रोह्यांना खुमखुमी आल्यावाचून रहात नाही. सैन्यदलाने केलेल्या कारवाईच्या संदर्भात पाकप्रेमी अभिनेत्री स्वरा भास्करही नेहमीप्रमाणे बरळल्या. काय तर म्हणे, ‘हे युद्ध नसून ‘प्रपोगंडा’ (प्रसार) आहे. हे युद्ध आता घरापर्यंत येईल.’ ‘घरापर्यंत येईल’ कशाला ? आतंकवाद्यांनी ते घरापर्यंत आणलेच आहे. केवळ हिंदू निद्रिस्त असल्यानेच आतंकवाद आता घरात शिरून हिंदूंच्या उरावर येऊन बसला आहे; पण पाकप्रेमात अखंड बुडलेल्या स्वरा यांना हे कसे लक्षात येणार ? आतंकवादाचे समर्थन करून युद्धाला विरोध करणार्यांनी भारतात रहावे तरी कशाला ? बरे इतकेच बोलून त्या थांबल्या नाहीत. भाग्यनगर येथील ‘कराची बेकरी’वर तिरंगा फडकवण्यात आल्याप्रकरणी त्या म्हणाल्या, ‘‘हा मूर्खपणा कधी संपेल ?’’ अर्थात् यामुळे अनेकांनी स्वरा यांना ‘देशद्रोही’ ठरवून स्वतःचे देशप्रेम दाखवून दिले, हे वेगळेच ! पाकिस्तानी कलाकारांनीही भारताच्या मोहिमेला ‘क्रौर्य’, ‘भ्याड’ असे म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षाला ‘दुर्दैवी’ म्हटले. सामाजिक माध्यमांवरही ‘स्टॉप वॉर (युद्ध थांबवा)’, ‘नो टू व्हायलन्स (हिंसा नको)’, अशा ‘हॅशटॅग’द्वारे निषेध करण्यात आला. अशी आवाहने आतंकवाद्यांसमोर केली जात नाहीत. टिमकी वाजवायची ती केवळ हिंदूंसमोर; कारण ते सहिष्णु आहेत. असे करणे भारतातील साम्यवादी आणि देशद्रोही विचारसरणी असणार्यांना जमते. खरे तर सैन्यदलाने केलेली कारवाई अचूक, नियंत्रित आणि लक्ष्यभेदी होती. असे असतांना केली जाणारी राष्ट्रविरोधी टीका सैनिकांचा आत्मविश्वास न्यून करणारी ठरू शकते. यादृष्टीनेही प्रत्येकाचा विचार व्हायला हवा. वारंवार बेधडक विधाने करून चुकीची माहिती पसरवणे सर्वथा अयोग्य आहे. सैन्य कारवाईविषयी अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे आणि प्रसंगी त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकारी, आधुनिक युगातील युद्धजन्य परिस्थितीचे विश्लेषक आणि लेखक जॉन स्पेन्सर यांनी या मोहिमेचे पुष्कळ कौतुक केले आहे. त्यांनी ‘या मोहिमेद्वारे भारताने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले’, असे सांगितले. जे अमेरिकेतील अधिकार्याला कळते, ते भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, हिंदुद्वेषी, तथाकथित मानवतावादी यांना कळत नाही, हेच मुळात दुर्दैवी आहे.

टीकेमागील हिंदुद्वेषी विचारधारा !
अनेक दशकांपूर्वी काश्मिरी हिंदूंची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यांना त्यांच्याच राज्यातून निर्वासित व्हावे लागले, याविषयी ही सर्व मंडळी सोयीस्कररित्या मौन बाळगतात. आतापर्यंत देशभरातही सहस्रो हिंदूंच्या हत्या झाल्या; पण त्या करणार्यांच्या मानसिकतेविरोधात किंवा विचारसरणीच्या विरोधात आजवर कुणीही आवाज उठवलेला नाही. हे वास्तव नाकारून चालणार नाही. काँगे्रसमधील काहींनी टीका केली असली, तरी पक्षातील शशी थरूर असोत किंवा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा असोत, त्यांनी सैनिकी कारवाईचे समर्थन केले आहे. काँग्रेसमधील एका गटाला आतंकवादविरोधी कृत्याचे किंवा सैन्याचे जे महत्त्व कळते, ते दुसर्या गटाला कसे कळत नाही ? या टीकांची शृंखला चालूच रहाणार आहे. या टीकेमागील विचारधारेकडे गांभीर्याने पहायला हवे.
इशरत जहाँ ही आत्मघातकी आतंकवादी होती. तिला पोलिसांनी पकडल्यावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी तिच्या निर्दाेषत्वाचे गोडवे गायले. ती ठार झाल्यावर तिच्या कुटुंबियांना तातडीने १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. आतंकवाद्यांचा इतका पुळका कशासाठी ? मानवतावादाचा पुळका असलेल्यांनीही पहलगाममधील आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य केल्याचे कुठे ऐकिवात नाही. असा दुटप्पीपणा करण्यामागे हिंदुद्वेषच कारणीभूत आहे. आतंकवाद्यांनी ‘धर्म’ विचारून ठार केले आणि ‘धर्म’ पाहूनच अर्थसाहाय्य करण्याचे टाळण्यात आले, यात भेद तो काय ? आतंकवाद्यांची तळी उचलणार्यांना काय संबोधायचे, हे आता जनताच ठरवेल ! अशा प्रकारे राष्ट्र-धर्मद्वेषींवर जर तात्काळ जरब बसवली नाही, तर भारत महासत्ता तरी कसा होईल ? यासाठी सरकारनेच कसोशीने प्रयत्न करायला हवेत.
| आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे ! |
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
संपादकीय : हिंदू जात्यात !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
संपादकीय : हरवलेले समाधान !