वॉशिंग्टन (अमेरिका)- भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकच्या वायदूलाच्या ११ तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. याचे पुरावे भारतीय संरक्षण दलांनी पत्रकार परिषद घेऊन सादर केले होते. तरीही अमेरिकी प्रसारमाध्यमांनी ते नाकारले होते; मात्र आता त्यांच्याकडूनच भारताच्या आक्रमणात पाकची मोठी हानी झाल्याचे वृत्त प्रसारित केले जात आहे. ‘न्यूयॉर्क’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
१. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी आधुनिक युद्धतंत्र आणि अचूक शस्त्रे वापरली; परंतु धोरणात्मक दृष्टीकोनातून भारताचे नियोजन आणि कार्यवाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. भारताने तांत्रिक आणि सामरिकदृष्ट्या पाकिस्तानपेक्षा चांगली कामगिरी केली. या यशस्वी कारवाईनंतर पाकिस्तानने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला, जो भारताने मान्य केला. हे ऑपरेशन केवळ भारताच्या सैनिकी सिद्धतेचे प्रतीक नाही, तर भारत आता कोणत्याही आक्रमणाला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, हे या कारवाईतून सिद्ध झाले..
२. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने उपग्रह प्रतिमा आणि इतर पुरावे यांचा हवाला देऊन तज्ञांनी केलेल्या विश्लेषणाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये झालेल्या भारतीय आक्रमणांमध्ये वायूदलाच्या किमान ६ तळांवरील धावपट्ट्या आणि केंद्र यांची हानी झाली. तज्ञांच्या मते, दोन्ही देशांमध्ये दशकांपासून चालू असलेल्या संघर्षातील हे सर्वांत मोठे आक्रमण होते. भारताने लक्ष्य केलेली काही ठिकाणे पाकिस्तानच्या १०० मैल आत होती.

Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प