भारत आणि पाकिस्तान या देशांमधील संघर्षाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

८.५.२०२५ या दिवशी केलेले सूक्ष्म परीक्षण  

‘७.५.२०२५ या दिवशी रात्री भारताने पाकिस्तानातील ९ आतंकवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. ८.५.२०२५ या दिवशी पाकिस्तानने भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. त्या वेळी भारतानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या दिवशी सायंकाळी ५ वाजता या घटनेचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.

भारताने क्षेपणास्त्रांद्वारे पाकिस्तानची मोठी हानी केली आहे. त्या तुलनेत पाकिस्तानला भारताची हानी करता आलेली नाही. या घटनेमुळे ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्ती अस्वस्थ झाल्या असून त्या भारतावर पुष्कळ चिडल्या आहेत. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या शरिरात हृदय महत्त्वाचे असते, त्याप्रमाणे अनिष्ट शक्तींना पाकिस्तान हा देश हृदयाप्रमाणे महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अनिष्ट शक्ती पाकिस्तानला वाचवण्यासाठी कार्यरत झाल्या आहेत. अनिष्ट शक्तींनी चीन, तुर्कीये आणि काही इस्लामी देश यांना पाकिस्तानच्या साहाय्याला पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अनिष्ट शक्ती या देशांना पाकिस्तानला साहाय्य करण्याची प्रेरणा देणार आहेत. परिणामी भविष्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यासाठी पुष्कळ बळ मिळणार आहे.

त्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता ‘तुर्कीयेने एक युद्धनौका पाकिस्तानच्या साहाय्यासाठी कराचीमध्ये पाठवली’, अशी वार्ता मला समजली. यावरून ‘अनिष्ट शक्ती जे ठरवतात, ते प्रत्यक्षातही लगेच कृतीत आणतात’, हे माझ्या लक्षात आले.

श्री. राम होनप

१०.५.२०२५ या दिवशी केलेले सूक्ष्म परीक्षण 

१०.५.२०२५ या दिवशी सायंकाळी भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये अकस्मात् युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धविरामाच्या घोषणेमुळे ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्ती पुष्कळ चिडल्या आहेत. त्या पाकिस्तानला साहाय्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पाकिस्तान भारताचा कधीही विश्वासघात करू शकतो. परिणामी भारताने पाकिस्तानपासून नेहमीच सावध रहाणे आवश्यक आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.