अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटगॉन’चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकला त्याची लायकी दाखवली !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताने पाकच्या विरोधात केलेल्या ४ दिवसांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची स्थिती एक घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती. जो केवळ युद्धविरामाची भीक मागत होता. पाकिस्तान हा पराभव आता लपवू शकत नाही. वाईट पद्धतीने त्याचा पराभव झाला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटगॉन’चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकचे वाभाडे काढले आहेत. ते ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भारताच्या सैनिकी कारवाईचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
After the Pahalgam attack, 🇮🇳 India hit back HARD 💣 with #OperationSindoor — forcing Pakistan to beg for ceasefire 🤲
💥 "Pakistan ran like a scared dog with its tail between its legs!" — Ex-Pentagon official Michael Rubin,
But the warning is clear:
⚠️ Pakistan always returns… pic.twitter.com/WgBBGcTdxp— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2025
मायकल रुबिन यांनी सांगितलेली सूत्रे
१. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जी कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तानला कूटनीतिक आणि सैन्य आघाडी यांवर मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
२. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने त्वरित आणि अचूकता यांद्वारे आतंकवाद्यांच्या ठिकाणावर प्रहार केले. यातून पाकिस्तानकडून आतंकवादाला जो आश्रय दिला जातो, त्याकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले. पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला. हा भारताचा कूटनीतिक विजय आहे
कोण आतंकवादी आणि कोण सैनिक ?
पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी सैन्य पोषाखात येऊन आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात, तेव्हा कोण आतंकवादी आणि कोण सैनिक ? हा भेद संपून जातो, असे रुबिन यांनी म्हटले.
संपादकीय भूमिकापाकिस्तानला मोकळे सोडू नये; कारण तो उलट फिरून पुन्हा आक्रमण करू शकतो. त्यामुळे त्याला नष्ट करणेच आवश्यक आहे ! |
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !