अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्‍यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?

राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्‍वराने शक्ती द्यावी ! – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

परमेश्‍वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ?

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ सहस्र ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीची हानी

१७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्‍यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीची पुष्कळ हानी

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावे गेले २ दिवस अंधारात आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात ३३ लहान आणि ४ मोठ्या नौकांची हानी

तौक्ते चक्रीवादळाने विविध प्रकारच्या हानीसह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाचा मोठा फटका मत्स्यव्यवसायालाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चक्रीवादळानंतर मुंबई येथे अरबी समुद्रात ४ जहाजे अडकली !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

राज्यात विविध ठिकाणी चक्रीवादळाचा फटका, ११ जणांचा मृत्यू !

वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता. राज्यातील सहस्रावधी बांधकामांची पडझड ! जहाजात अडकलेल्या १३७ प्रवाशांना सुरक्षित हालवले ! ‘मुंबई हाय’जवळ ओ.एन्.जी.सी. कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; ९६ जण बेपत्ता !

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात महाराष्ट्रात ११ जणांचा मृत्यू, तर १२ सहस्र घरांची हानी ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री

‘राज्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, तर १२ सहस्र घरांची हानी झाली आहे. आतापर्यंत १५ सहस्र लोकांना सुरक्षित जागेवर हालवले आहे

चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील संरक्षक कठडा कोसळला !

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८ मे या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे. याविषयी माहिती मिळताच मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.