मासेमारीच्या ५५० जाळ्या वाहून गेल्या
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – तौक्ते चक्रीवादळाने विविध प्रकारच्या हानीसह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाचा मोठा फटका मत्स्यव्यवसायालाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात मासेमारीच्या एकूण ५५० जाळ्या वाहून गेल्या आहे, तर ३३ लहान आणि ४ मोठ्या मासेमारी नौकांची हानी झाली आहे, असा प्राथमिक अंदाज मत्स्यव्यवसाय खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मालवण तालुक्याला सर्वाधित फटका बसला असून तालुक्यात मासेमारीच्या ३०० जाळ्या वाहून गेल्या आहेत, तसेच १५ लहान नौकांची हानी झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यात १५० जाळ्या वाहून गेल्या असून १२ लहान नौकांची हानी झाली आहे. देवगड तालुक्यात १०० जाळ्या वाहून गेल्या असून ६ लहान नौका आणि ४ मोठ्या नौकांची हानी झाली आहे.