मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे का ?, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन करून १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रहित करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव पालटा !

कराची स्वीट्स या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानातील आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.

मुंबईत दिवाळीत गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण

या वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाल्याची नोंद ‘आवाज’ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाले आहे.

मुंबईत फटाकेबंदी कागदावरच

दीपावलीच्या दिवसात मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी आवाजी फटाके फोडू नयेत, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही

‘रेड झोन’मध्ये आंब्यांची विक्री करून येणारे चालक आणि त्यांचे सहकारी यांना वेगळे ठेवण्यात येणार

कोरोनाचा संसर्ग असलेल्या अतीसंवेदनशील क्षेत्रामध्ये (रेड झोनमध्ये) आंबा विक्री करून येणारे वाहनचालक आणि त्यांचे सहकारी यांना गोदामात किंवा अन्य वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचे नूतन आयुक्त चहल यांच्याकडून कामास प्रारंभ

इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून कामास प्रारंभ केला. त्यांनी नायर रुग्णालयाला भेट देत तेथील उपचार, तसेच रुग्णालयातील व्यवस्था आणि साधनसामुग्री यांचा आढावा घेतला.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.