राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची सूची राज्यपालांकडे !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – महाराष्ट्राच्या विधान परिषदेत नियुक्त करण्यासाठी राज्यशासनाकडून पाठवलेली १२ सदस्यांच्या नावांची सूची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे असल्याची स्वीकृती राजभवन सचिवालयाच्या उपसचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. ६ नोव्हेंबर २०२० या दिवशी सूची राज्यपालांकडे पाठवण्यात आली; मात्र ७ मासांनंतरही नियुक्ती न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती विचारली. त्यानंतर प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीत वरील सूत्र स्पष्ट झाले.