मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर या दिवशी खार येथील श्री रामकृष्ण मठाला भेट दिली. या वेळी स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन त्यांनी आश्रमातील नामजप आणि भजन यांमध्ये सहभाग घेतला.
श्री रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले. आश्रमाच्या वतीने चालवले जाणारे रुग्णालय आणि सेवाकार्य यांची माहिती स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांना दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रुग्णालयाला अत्याधुनिक यंत्रसाम्रगी खरेदी करण्यासाठी, तसेच शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यपालांनी शारदामाता मंदिरालाही भेट देऊन उपस्थित साधूंशी संवाद साधला. या वेळी मठाचे साहाय्यक सचिव स्वामी अपरोक्षानंद, व्यवस्थापक स्वामी देवकांत्यानंद, स्वामी तन्नमानंद, रामकृष्ण मिशन रुग्णालयाचे डॉ. स्वामी दयामुर्त्यानंद यांसह अन्य साधूगण उपस्थित होते.