बंदमुळे झालेली हानी सत्ताधार्‍यांच्या खिशातून भरून काढा ! – भातखळकर, आमदार, भाजप

पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाड येथील दुकानदारांना पोलिसांच्या साहाय्याने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगणार्‍या शिवसेनेचा प्रयत्न आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

मुंबई पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहेत ! – समीर वानखेडे, अधिकारी, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याची सूचना कुणालाही दिली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार ! – संजय राऊत

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला दसरा मेळावा यावर्षी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद; मात्र भाजपचा विरोध !

मुंबई आणि ठाणे येथे नागरिकांचे हाल ! काँग्रेसचे राजभवनावर मूक आंदोलन, वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !

वाळकेश्वर (मुंबई) येथील बाणगंगा कुंडातील सहस्रावधी मासे मृत

देवस्थान आणि महानगरपालिका प्रशासन यांनी एकत्रितरित्या येथे स्वच्छता राखण्याविषयी धोरण ठरवणे आवश्यक आहे; अन्यथा हिंदूंच्या धार्मिक विधींविषयी समाजातही चुकीचा संदेश जाईल !

हिंदु धर्माचा अभ्यास करून चुकीच्या आक्षेपांचे खंडण करा ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मागील काही वर्षांपासून हिंदु धर्म आणि आपला इतिहास यांविषयी सतत अपसमज पसरवले जात आहेत. आपल्या धर्मग्रंथांची उपेक्षा केली जात आहे. असेच चालू राहिले, तर आपले अस्तित्व टिकवता येणार नाही. आपल्या धर्मावरील चुकीचे आक्षेप खपवून घेऊ नका.

मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत विद्यापिठाला मुंबई विद्यापिठाच्या परिसरात जागा देण्याच्या प्रस्तावावर कुलगुरु राजकारण करत असल्याचा युवा सेनेचा आरोप

मुंबई विद्यापिठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ चालू करण्यासाठी राज्यशासनाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर ७ मास होऊनही विद्यापिठाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणी कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर राजकारण करत असल्याचा आरोप युवा सेनेच्या सदस्यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत केला.

मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु आणि प्र. कुलगुरु यांच्यासाठी खरेदी केलेल्या महागड्या गाड्यांच्या प्रकरणी चौकशी !

मुंबई विद्यापिठाचे कुलुगुरु प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांच्यासाठी ६० लाख रुपयांहून अधिक व्यय करून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांच्या प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी केली.

नवाब मलिक यांच्यावर १०० कोटी रुपयांचा खटला नोंदवणार ! – मोहित कंबोज

‘क्रूझ’वर अटक करण्यात आलेला ऋषभ सचदेव हा कंबोज यांचा मेव्हणा आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी कंबोज यांनी प्रसारमाध्यमांकडे त्यांची वरील भूमिका मांडली.

‘खान’ आडनाव असल्यामुळे आर्यन पीडित ठरतो का ? – आमदार नीतेश राणे, भाजप

भाजपच्या नेत्यांनी आणलेल्या दबावामळे ३ आरोपींना सोडून देण्यात आले’, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी केला आहे. त्याला नीतेश राणे यांनी ‘ट्वीट’ करून उत्तर दिले आहे.