पुढील ४ दिवसांत कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा अतीवृष्टी होणार ! – हवामान विभागाची चेतावणी 

गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…

सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना वेळच दिला नाही ! – प्रशांत बंब, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना आणि दुष्काळाचे प्रश्‍न या सर्वांवर विरोधी पक्षातील आमदारांना बोलायचे आहे. यांवर आम्हाला मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी, तसेच आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !

२९ जुलै या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

राज्य सरकारच्या संमतीनेच ‘फोन टॅपिंग’ ! – रश्मी शुक्ला यांच्या अधिवक्त्यांची माहिती

राज्य पोलीस महासंचालकांनी याविषयीचे आदेश दिले होते.

परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी पोलिसांकडून ७ सदस्यीय समिती स्थापन !

भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचा आरोपींचा न्यायालयात दावा !

त्यामुळे एल्गार परिषदेनंतर उसळलेली दंगल आणि त्याअंतर्गत लावण्यात आलेला आतंकवादविरोधी कायदा रहित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे ! – कु. अदिती तटकरे, राज्य उद्योगमंत्री

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मागील ५ वर्षांत ३ वेळा चक्रीवादळ आले होते. २-३ वेळा पूर आला होता. अशा वेळी स्थानिक पातळीवरील पथकांना बचावकार्य करण्यास अडचण येते.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नका ! – उच्च न्यायालयाचा ‘ईडी’ला आदेश

‘एन्.एस्.ई.एल्.’ आणि ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणी २८ जुलै या दिवशी सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु न्यायालय सध्या परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी घेत आहे.

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत.