देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा !

हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्‍या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ?

मुंबईतील दहीहंडी उत्सवात ७ व्या थरावरून पडून घायाळ झालेल्या गोविंदाचा मृत्यू !

३ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ‘गोविंदा’ संदेश दळवी (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते ‘शिवशंभो गोविंदा पथका’तील गोविंदा होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यावर ते ७ व्या थरावरून पडून घायाळ झाले होते.

विधानभवनासमोर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न !

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आग विझवत देशमुख यांना जवळच्या रुग्णालयात भरती केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची हानीभरपाई शासन निकषानुसार देणार ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

२२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. त्या वेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यांची चौकशी व्हावी ! – अमित साटम, आमदार, भाजप

देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असल्याचा साटम यांचा आरोप

मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललित हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी !

वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच निर्माण करणे आवश्यक !

अत्यल्प सदस्यांच्या उपस्थितीमुळे विधान परिषदेचे कामकाज स्थगित !

२३ ऑगस्ट या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता चालू होणार होते; मात्र अत्यल्प सदस्य उपस्थित असल्याने उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ! – हिंदु जनजागृती समिती

स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे.

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.