विधीमंडळाच्या आवारात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी !

पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली.

अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या परिसरात अवैध धंदे चालणार्‍या चित्रपटगृहाचा परवाना रहित ! – गृहमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या शांभवी लॉजिंग आणि बालाजी चित्रपटगृह येथे अवैध धंदे चालू आहेत, अशी माहिती..

चुकीच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तोंडघशी पडले !

भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाने जास्त पैसे कमावले. ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण ६,००० कोटी रुपये ! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे

मुंबई महापालिकेच्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा ! – अधिवक्ता आशिष शेलार, आमदार तथा अध्यक्ष, मुंबई भाजप

ज्या आस्थापनाला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या आस्थापनाने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट आणि खोटे आहे.

विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून एकनाथ खडसे आणि प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी !

२४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. याविषयीचे सूत्र उपस्थित करत सदस्य एकनाथ खडसे यांनी सत्ताधार्‍यांना याचा जाब विचारला.

डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

ज्यांच्या मागणीमुळे विधीमंडळाच्या कामकाजाच्या  प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला, असे विधीमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव करण्यात आला.

पंढरपूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभी करू ! – शंभुराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना केली होती. त्यावर शासनाच्या वतीने शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १०० टक्के जागा भरणार ! – शंभुराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १०० टक्के, तर अन्य विविध विभागांतील ५० टक्के जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेतून विरोधी पक्षनेत्याचा सभात्याग !

विधान परिषदेमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभात्याग केला.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न !

समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.