यापुढे अनाथ मुलांना मिळणार अपंग व्यक्तींप्रमाणे आरक्षण !

यापूर्वी राज्यशासनाने शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून १ टक्का आरक्षण घोषित करण्यात आले होते. वर्ष २०१८ मध्ये घेतलेल्या या निर्णयामध्ये राज्यशासनाने पालट केला आहे. यापुढे अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गाऐवजी अपंग व्यक्तींप्रमाणे एकूण जागांच्या १ टक्का आरक्षण …

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात ८०० ठिकाणी गदापूजन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !

मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पोलीस पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू !

पोलीसदलात कार्यरत असणार्‍या व्यक्तीलाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेची काय अवस्था ? हे सर्व पालटण्यासाठी कर्तव्यदक्ष, संवेदनशील अधिकारी हवेत !

‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !

सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.

न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात महाराष्ट्र ११ व्या स्थानी !

न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात महाराष्ट्र ११ व्या स्थानी आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रलंबित खटले आहेत.

५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मी सावरकर’ कार्यक्रम !

‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील, तर संगीत संयोजनाचे दायित्व प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘मेरक इव्हेंट्स’ने केले आहे.

युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार

यात्रेच्या सांगता सभेमध्ये गणेश नाईक म्हणाले की, देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वस्व पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतांनाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. हे आरोप करणार्‍यांचे दुर्भाग्य आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समोरील भागाला तडे !

येथील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे काही भेगा पडल्याचे आढळले आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’चे संवर्धन आणि दुरुस्ती यांसाठी ८ कोटी ९८ लाख २९ सहस्र ५७४ रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.